ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी
भोसरीतील श्री टागोर शिक्षण संस्थेत योगा दिन साजरा

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी नगर येथील श्री टागोर शिक्षण संस्थेचे श्री टागोर माध्यमिक विद्यालय, लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यामंदिर आणि श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये आज 21 जून शासनाच्या आदेशानुसार योगा दीन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेतील शिक्षक राजू पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगा प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आले.
यावेळी योगाचे महत्त्व, फायदे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले यामध्ये विद्यालयातील मुख्याध्यापक श्री हनुमंत आगे ,उद्धव ढोले, मनीषा गुरव आणि संतोष काळे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल बुळे यांनी केले तर आभार शरद तोरणे यांनी केले.













