भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय संविधानाचे वाचन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब कुंजीर मैदान या ठिकाणी सामूहिक संविधानच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. चिंचवड विधान सभा चे आमदार शंकर जगताप, विधान परिषद सदस्य अमित गोरखे ,पिं.चिं. मनपा शहर कार्याध्यक्ष भाजपा शत्रुघ्न काटे व संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
या वेळी मा. क्रीडा सभापती चंद्रकांत अण्णा नखाते, मा. सभापती महिला बाल विकास समिती निर्मला कुटे, उन्नती फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भिसे, चॅलेंजर एज्युकेशन पब्लिक स्कूलचे अध्यक्ष संदीप काटे, कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे, एम.बी कॉम्पुटर चे प्रोप्रायटर मोहन भालेराव , उद्योजक राहुल भातकुले , सामाजिक कार्यकर्ते युवराज प्रगणे , शाळे चे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक दुलीचंद भोईर व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थीही सहभागी झाले होते शाळेचा शिक्षिका पूजा देवगिरे , भावना देवरे, अनिता रोडे यांनी मराठी, हिंदी व इंग्लिशमध्ये संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती गीत गायले व एम.बी कॉम्पुटर चा वतीने इयत्ता १०वी च्या मुलांना परीक्षा पॅड व पेन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. नागरिकांमध्ये संविधानाची जनजागृती करण्यात आली. निशा पवार ह्याने संविधानच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करून उपस्थितांना शप्पथ दिली व आभार उर्मिला ठोंबरे ह्यांनी मानले.













