ताज्या घडामोडीपिंपरी
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी राज हेमंत तापकीर यांची निवड

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी राज हेमंत तापकीर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात त्यांनी पदभार स्विकारला आहे.
राज हेमंत तापकीर भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी म्हणून आपण भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवुन देण्यासह पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे काम तळागळातील सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी निवड झालेल्या राज तापकीर यांचे अभिनंदन करत पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.













