ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र
भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश सरचिटणीसपदी मनोज ब्राम्हणकर यांची नियुक्ती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश सरचिटणीस मनोज चिंतामण ब्राम्हणकर यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र त्यांना भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र
प्रदेशाध्यक्ष संजय गजानन गाते यांनी दिले.
आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय
जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे. ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच
जास्तीत जास्त ओबीसी भाजपा मध्ये सामील करण्यासाठी आपण अथक परिक्षम कराल असा
विश्वास आहे.













