बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये शिक्षक-पालक सहविचार सभा संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये आज शिक्षक-पालक सहविचार सभा व OPEN DAY संपन्न झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष गोकुळजी गायकवाड साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सन्माननीय सचिव एल.एस.कांबळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष पोपट आरणे , विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे व आदी पालकवर्ग उपस्थित होता.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली. शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा पोपट आरणे साहेब यांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. कोमल गायकवाड मॅडम यांची निवड करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बाबाजी शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास कसा करावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाविषयी सविस्तर माहिती दिली. प्रणित फाउंडेशनचे श्री. सोमनाथ थोरात सर यांनी प्रणित फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यालयांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. डोंगरदिवे सर यांनीही पालकांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे सचिव सन्माननीय श्री. एल. एस. कांबळे सर यांनी सध्याच्या काळातील विविध घटनांचा आढावा घेत असताना विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष गोकुळजी गायकवाड साहेब यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष घरडे, सुजाता जोगदंड, रूपाली पवार, पूनम तारख, संदीप बोर्गे, किशोर बडे, प्रमोद रायकर, अमोल सूर्यवंशी, धुडकू कुवर, स्वप्निल पठारे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील व जितेंद्र सूर्यवंशी यांनी केले तसेच आभार कोमल गायकवाड यांनी मानले.













