बीजेएस महाविद्यालयाच्यासमोर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बीजेएस महाविद्यालयाच्या गेटसमोर राष्ट्रवादी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत दादांचे वाजतगाजत स्वागत केले.
मारूती भगवंता गाडे (उपसरपंच वाघोली ग्रामपंचायत) यांच्या निवासस्थानी चहापानानिमित्त थांबून त्यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी जनता हीच माझी ताकद कार्य अहवालाचे वाटप करण्यात आले. महायुतीतील महिला पदाधिकाऱ्यांनी ”घड्याळ तेच, वेळ नवी” चा नारा देत आढळराव पाटलांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा संकल्प करत दादांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानसभा संयोजक शिरुर हवेली प्रदिपदादा कंद, अध्यक्ष हवेली तालुका भाजप संग्राम गावडे, उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव, युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप आबा सातव, युवा सेना शहर प्रमुख वाघोली यश सातव, युवा सेना मंगेश सातव, प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा भाजप दादासाहेब सातव, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी उमेश उंद्रे, पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे, जिल्हा सचिव भाजप मोहन अण्णा शिंदे, महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील, युवा मोर्चा पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष संदीप सातव, सरचिटणीस हवेली विजय जाचक, माजी उपसरपंच शांताराम बापू कटके, युवा सेना जिल्हा संघटक गणेश मस्के, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा गणेश सातव, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी पंचायत समिती सदस्य श्याम गावडे, वाहतुक सेना राजेंद्र तांबे आदि उपस्थित होते.













