बांगलादेशातील हिंदू नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात जन आंदोलन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज संपूर्ण महाराष्ट्रात सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदू नागरिकांवर होणाऱ्या प्रचंड अत्याचाराच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक चौकात जन आंदोलन करण्यात आले.
जसे १९४७ आपल्या हिंदूस्थान ची फाळणी झाली आणि पाकिस्तान ची निर्मिती झाली त्या वेळी त्या पाकिस्तानात संपूर्ण सिंध प्रांत आणि पंजाब चा काही भाग गेला आणि तेथील कट्टर पंथीय मुस्लिमांनी असेच सिंधी आणि पंजाबी नागरिकांवर अत्याचार केले होते पण त्या वेळी तेथुन निघुन हिंदूस्थानात प्रस्थापित झालेला सिंधी बांधव आज या आंदोलनात पिंपरी येथील शगुन चौकात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता
यामध्ये प्रामुख्याने सिंधी समाजातील प्रतिष्ठित नागरिक मनोहर जेठवानी, महेश मोटवानी, तुलसीदास तलरेजा, भगवान खत्री,नरेन भागचंदानी, गणेश वाणी ऍड सत्यनारायण चांडक,उमेश भामरे, हरेश छाबलानी हरेश तालोकानी जितू मंगतानी आणि व्यावसायिक, शिक्षण या क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.




















