बजाज ऑटो एम्ल्पॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकापासून कामगार वंचित, कामगार वर्ग नाराज

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बजाज ऑटो एम्ल्पॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. आकुर्डी पुणे या संस्थेच्या सन२०२४-२०२९ या कालावधी करिता संचालक मंडळ निवडणूकीची प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक आयोगा मार्फत दि. ०९/०१/२०२४ पासून सुरू करण्यात आलेली आहे.राज्य सहकारी निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार सोसायटीच्या २०१८ मध्ये निवडणूका रविवारी झाल्या असतानाही २०२४ च्या निवडणूकीचे मतदान मुद्दामहून बुधवारी ठेवण्यात आल्या असून मतदानापासून कामगार वंचित राहतील कामगारांना जाणून बुजून नाराज केल्याचा आरोप बजाज ऑटो एम्ल्पॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने केला आहे.
संस्थेच्या सर्व सभासदांना मतदानाचा हक्क बजावण्यात अडचण निर्माण होवू
शकते . कारण मतदान करण्यासाठी सभासदांना चाकण, वाळुंज औरंगाबाद व इतरस्त ठिकाणाहून
सुद्धा यावे लागणार आहे.प्रस्ताव दि. ०७/०२/२०२२ रोजी दाखल केला असतानाही त्याबददल संस्थेस काही कळविले नाही.आणि एकूणच सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सदर निबंधक असंतुष्ट सभासदांच्या बाजुने काम करित असल्याचा आम्हास दाट संशय आहे. यापुर्वी सभासदांना निवडणूक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी आणि बजाज ऑटो कंपनीच्या बाहेर घेण्यासाठी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे सन २०१५ मध्ये राज्य सहकारी निवडणूक आयोगाविरूद्ध दाद मागावी लागली होती आणि त्यानंतर झालेली
निवडणूक दिनांक २३/१२/२०१८ रविवारी रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै. वसंतदादा
पाटील विद्यामंदीर आकुर्डी पुणे येथे झालेली आहे. तरिही कामगार सभासदांना सुट्टी असलेल्या रविवार
या दिवशी निवडणूक न ठेवता मुद्दाम बुधवार दिनांक २१/०२/२०२४ रोजी ठेवण्यात आली असून
त्याबाबतीत संघटनेमार्फत लढा देण्यात येणार आहे. असे संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार /
सरचिटनीस राजेंद्र महाडीक यांनी जाहिर केले.













