ताज्या घडामोडीपिंपरी

प्रा. प्रकाश सोनटक्के यांना पीएचडी प्रदान 

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचे प्रा. प्रकाश विजय सोनटक्के यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘डिटेक्शन ॲण्ड मायटिगेशन ऑफ मलेस्युस अटॅक्स इन ऑटोनॉमस व्हेइकल्स’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यांना पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. सोनटक्के यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होत संशोधन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांसह सहयोगी संशोधन – प्रा. डॉ. गुयेन ची न्गॉन, डीन, कॅन-थो युनिव्हर्सिटी व्हिएतनाम. प्रो. न्युयेन व्हॅन कुओंग, डीन, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी कॅन-थो युनिव्हर्सिटी व्हिएतनाम. प्रो. सेल्वाकुमार मनिकम, सहयोगी प्राध्यापक, नॅशनल ॲडव्हान्स्ड आयपीव्ही ६ सेंटर ऑफ एक्सलन्स, युनिव्हर्सिटी ऑफ सेन्स पेनांग मलेशिया. जिलाद बंदेल, उपाध्यक्ष, अरिलौ ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी, इस्रायल. प्रो. डोनाटो अब्रुझेस, रोम युनिव्हर्सिटी ऑफ रोम टोर व्हर्गाटा, इटली. डॉ. लिम टिओंग हू, सहाय्यक. प्रोफेसर, युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी ब्रुनेई यांच्या समवेत संशोधन आणि शोध निबंध सादर केले आहेत.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ नीलकंठ चोपडे यांनी प्रा. डॉ. सोनटक्के यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button