प्रा . डॉ. चैत्रा संतोषकुमार मस्तुद यांना ‘बेस्ट फीमेल एंटरप्रेनर’ अवॉर्डने सन्मान

दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्राध्यापक डॉ. चैत्रा संतोषकुमार मस्तुद यांना इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे आयोजित ग्लोबल कॉनक्लेव ऑन ओरल हेल्थ इनोव्हेशन अँड रिसर्च या आंतरराष्ट्रीय परिषदेतील ‘बेस्ट फीमेल एंटरप्रेनर (वुमेन इन इनोवेशन)’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे संपन्न झाली.
पुरस्कार वितरण समारंभात इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शुभ्रा नंदी, सचिव डॉ. अशोक ढोबळे, कॉन्क्लेव चेअरमन डॉ. राजीव चुग, ऑर्गनायझेशन सेक्रेटरी डॉ. शरद कपूर, डॉ. ओ. पी. खरबंदा,श्री.मनिष पाटील तसेच एफडीआय सेक्रेटरी डॉ. एन्जो (अमेरिका) यांच्या उपस्थितीत डॉ. चैत्रा यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ.चैत्रा मस्तुद यांनी दंतव्यंगोपचार तज्ञ आणि डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्स या शाखेमध्ये एम.डी.एस,.आय.बी.ओ.,पी.एच.डी. शिक्षण पूर्ण केले असून त्या डॉ. डी. वाय. पाटील दंत वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र पिंपरी येथील ऑर्थोडोन्टिक्स आणि डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्स विभागात प्राध्यापक व पी.जी. मार्गदर्शक म्हणून त्या कार्यरत आहेत. दंतोव्यंगोपचारांमधील ‘पेडियाट्रिक ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया’ याआजारावरील उपचार या विषयाचा अभ्यास करुन पीएचडी करणाऱ्या त्या पहिल्या दंतोव्यंगोपचार तज्ञ आहेत.
डॉ.चैत्रा यांना अँटीस्नोरिंग डिवाइस इन पेडियाट्रिक ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया या इनोवेशन बद्दल हे अवॉर्ड मिळाले. त्यांच्या या इनोव्हेशनची निवड ‘टॉप फाईव्ह बेस्ट इनोव्हेशन इन ग्लोबल कॉनक्लेव’ यामध्ये झाली.
दिल्ली येथे पार पडलेल्या दोन दिवसाच्या या कॉन्फरन्स मध्ये विविध विषयावरील रिसर्च आणि इनोव्हेशन यासाठी डॉक्टर्सनी भाग घेतला होता. डॉ.चैत्रा यांनी जजेस, फॉरेन डेलिगेट्स,इनोवेशन स्पॉन्सर्स, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर्स यांच्यासमोर केलेल्या प्रेझेंटेशन मध्ये वेडेवाकडे दात, दात पुढे असणे आणि घोरणे यासंबंधीतील होणारे भविष्यातील त्रास आणि आजार याबद्दल केलेल्या संशोधनातून आपण अँटीस्नोरिंग डिवाइस हे वापरून होणारे दुष्परिणाम प्रिव्हेन्शन करता येईल, टाळता येईल.लहान मुलांमधील घोरणे आणि दात पुढे असणे याचा एकमेकांशी संबंध आहे.त्यामुळे झोपेत तोंड उघडे राहते व तोंडाने श्वास घेतला जातो.पालकांना लवकर याबाबत निदान होत नाही आणि याची ट्रीटमेंट घेण्यासाठी नेमके कोणत्या तज्ञाकडे जावे याबद्दल माहिती नसते.डॉ.चैत्रा यांच्या म्हणण्यानुसार लवकर निदान लवकर उपचार याप्रमाणे लहान मुलांमध्ये याचा उपचार केल्यास पुढील होणारे दुष्परिणाम टाळता येतील. समस्येवर प्रभावी उपाय शोधण्याच्या दृष्टीने त्यांनी संशोधन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलगुरु डॉ. स्मिता जाधव, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, विश्वस्त डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील, कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर तसेच दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डी. गोपालाकृष्णनन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.













