Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग) – ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ हे आमचे हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम असले पाहिजे. जातपात धर्म न बघता समाजकारण समाजसेवा हे आमचे हिंदुत्व आहे. औरंगाबादच नाव आपण छत्रपती संभाजीनगर केलं पण दंगली होऊ दिल्या नाहीत कारण आपण सर्वांना सोबत घेतलं आणि तो निर्णय घेतला ह्यालाच आपण हिंदुत्व आपण बोलत असतो, असे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते.

“हृदयात राम आणि हाताला काम” हे आपलं हिंदुत्व असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाची महान्याय सभा पिंपरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्य संघटक एकनाथ पवार, मावळ लाेकसभा मतदार संघाचे संघटक संजाेग वाघेरे पाटील, पुणे जिल्हाप्रमुख ॲड. गाैतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटक संतोष वाळके, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, युवा सेना अधिकारी चेतन पवार, माजी नगरसेवक मीनल यादव आदी उपस्थित होते.

राज्यात आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. सत्तेत आलो की पहिल्याच बैठकीत आरक्षण मिळवून देऊ म्हणाले होते. रोजगार मिळवून देऊ म्हणाले, महागाई संपवू म्हणाले होते. पण आता काय सुरु तर सत्तर वर्षांपूर्वी त्यांनी काय केले होते? आता किती वर्षे तेच तेच उकरून काढणार आहेत. आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत.

खरे देशद्रोही कोण?

ठाकरे म्हणाले, चाळीस गद्दार जसे सुरतेला पळाले, तसेच सगळं त्यांच्या आवडत्या राज्यात जातेय, म्हणजे कुठे तर गुजरातला जातेय. आता तर वर्ल्ड कपची फायनल पण गुजरातला नेली. आता हीच फायनल मुंबईला झाली असती तर आपण नक्कीच जिंकलो असतो. मात्र फक्त स्वतःच्या प्रसिद्धी साठी हे सगळा खटाटोप सुरु आहे. वेदांता फॉक्सकॉन कंपनी आता गुजरात मध्ये ही होणार नाही. त्यांनी करार रद्द केला, कारण तिथे कंपनी उभारायला सात वर्षे लागणार होते, त्यामुळे त्यांनी देशातूनच हद्दपार व्हायचा निर्णय घेतला. म्हणजे गुजरातचे भले करण्याच्या नादात देशाचे नुकसान झाले. आता सांगा, मग खरे देशद्रोही कोण आहेत? असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version