Spread the love

 

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज सांयकाळी झालेल्या धुवाधार पावसात आकुर्डीतील दत्तवाडी विठ्ठलवाडी क्रांतीनगर साई दर्शन नगर परिसरात बहुतांशी भाग कंबरे एवढा पाण्याखाली गेला असून नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे नागरिकांची फार तारांबळ उडाली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना याचा फटका बसल्याचा आरोप दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठान चे इखलास सय्यद आणि तौहिद जावेद शेख यांनी केला आहे.

पावसाळ्यापूर्वी ज्या भागात गंभीर परिस्थिती निर्माण होईल अशा सर्व ठिकाणी स्ट्रोम वॉटर लाईन दुरुस्त करावी आवश्यक त्या ठिकाणी नवीन लाईन टाकणे गरजेचे असल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले होते तसेच काम लवकर सुरू करने बाबत वारंवार मोबाईल द्वारे पाठपुरावा करून देखील स्थपत्य विभागाच्या अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष घातले नाही या सर्व ठिकाणी स्थपत्य विभागाचे अधिकाऱयांना समक्ष जागेवर नेऊन परिस्थिती दाखवून सुद्धा अधिकार्यांनी वेळकाढूपणा केला असल्याचा आरोप इखलास सय्यद आणि तौहिद जावेद शेख यांनी केला आहे
या सर्व ठिकाणी स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्याचे काम लवकर सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version