प्रभाग -१३ निगडी गावठाण, साईनाथनगर, यमुनानगर, सेक्टर 22 या भागात पाणीपुरवठा 24 तास चालू करण्यात यावा- सचिन चिखले

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निगडी गावठाण, साईनाथनगर, यमुनानगर, सेक्टर 22 या भागात पाणीपुरवठा 24 तास चालू करण्यात यावा, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आयुक्त यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,प्रभाग क्रमांक १३ निगडी , यमुनानगर, साईनाथ नगर , सेक्टर 22 , या भागामध्ये 2017 ते 2022 या कालावधीमध्ये 24 /7 सर्वे अंतर्गत अनेक ठिकाणी नव्याने पाईपलाईन टाकण्यात आल्या व जीर्ण जुन्या झालेल्या पाईपलाईन काढून टाकण्यात आल्या, प्रभागात काही ठिकाणी अजूनही 24/7 अंतर्गत पाईपलाईन टाकलेल्या नाहीत, त्या टाकण्याची अत्यंत गरज आहे.
त्याचे परीक्षण व पाहणी करण्यासाठी A/2 झोन हा त्वरित 24/7 पाणीपुरवठा सल्लागार VRL यांच्याकडे हस्तांतरण करण्यात यावा जेणेकरून 24/7 प्रोजेक्ट चालू करण्यासाठी सल्लागार यांना काम करणे सोपे जाऊन लवकर 24/7 प्रोजेक्ट चालू करण्यासाठी मदत होईल.
प्रभागामध्ये अजूनही काही ठिकाणी खास करून सेक्टर 22 निगडी गावठाण या भागात 24/7 अंतर्गत पूर्ण सर्वे करून नव्याने पाईपलाईन टाकण्याची व नव्याने नळ कनेक्शन देण्याची अत्यंत गरज आहे. अजूनही काही ठिकाणी गढूळ व दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ओरड आहे. त्यामुळे आम्ही आपणास नम्र विनंती करतो की पुन्हा एकदा संपूर्ण प्रभागाचा सर्वे करून पाहिजे त्या ठिकाणी नव्याने पाईपलाईन टाकून नव्याने कनेक्शन देऊन नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात यावे, असे ही निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना राजु साठे , इस्माईल शेख , वैभव फाळके , जय सकट आदी उपस्थित होते.













