कुणाल आयकॉन रस्ता सिमेंट कॉक्रीटचा होवून अत्याधुनिक पद्धतीने विकसित होणार – नाना काटे यांच्या प्रयत्नांना यश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रस्ता सिमेंट कॉक्रीटचा होवून अत्याधुनिक पद्धतीने विकसित होणार माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.
प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे आज या रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात आली असून लवकरच हा रस्ता अत्याधुनिक पद्धतीने स्मार्ट होणार आहे.
नाना काटे यांनी शिवार चौक ते छत्रपती चौका पर्यंतचा रस्त्याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, संपूर्ण पिंपळे सौदागर मधील ९ मीटर ते ४५ मीटर पर्यंतचे रस्ते हे सिमेंट कॉक्रीटचे झाले असून फक्त हाच कुणाल आयकॉन रस्ता बरेच दिवस लालफितीत अडकून पडलेला होता, त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने परिसरातील नागरिक हा रस्ता कधी होणार किवा याचे डांबरीकारण कधी होणार हा रस्ता सिमेंट कॉक्रीटचा कधी होणार, याचे टेंडर कधी निघणार या नागरिकांच्या प्रश्नाच्या रोषास आम्हाला सामोरे जावे लागत होते . कुणाल आयकॉन रस्ता हा खूप रहदारीचा व वर्दळीचा आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निवासी सोसायट्या, शाळा, व्यावसायिक दुकाने आहेत त्यामुळे हा रस्ता खूप महत्वाचा आहे ही बाब नाना काटे यांनी याबाबत आयुक्त, अति-आयुक्त, स्थापत्य प्रकल्प , स्मार्ट सिटी विभाग, यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटून नागरिकानसमवेत महापालिकेत चर्चा करून त्यांच्या निदर्वेशनास आणून दिली व त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा देखील केला त्यास अनुसरून यशप्राप्ती म्हणून आज दि १५/०३/२०२४ रोजी महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने निविदा काढण्यात आली आहे व लवकरच या रस्त्याचे काम देखील चालू होणार आहे.












