प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.बोर्ड) इयत्ता 10 वी. 12 वीचा निकाल 100 टक्के

चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.बोर्ड) इयत्ता 10 वी. 12 वीचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले.
10 वी.
गायत्री साळुंके 94.8 टक्के-प्रथम क्रमांक, मंदार कदम 93.6 टक्के-द्वितीय क्रमांक, संस्कृती काटकमवार 92.6 टक्के-तृतीय क्रमांक, निशांत मथड 92.6 टक्के-तृतीय क्रमांक, रुचिता एतिडे 92.4 टक्के-चतुर्थ क्रमांक, शांभवी पिकले 92.2 टक्के-पाचवा क्रमांक संपादन केला. तसेच 106 विद्यार्थांपैकी 90 टक्केच्या वरती 11 विद्यार्थांनी गुण संपादन केले आहे.
12 वी.
शर्वरी कुलकर्णी 94.6 टक्के-प्रथम क्रमांक, तनिष्का लोहिया 92.8 टक्के द्वितीय क्रमांक, मानव शाह 92.4 टक्के-तृतीय क्रमांक, सुमैय्या हिंदोळकर 92.00 टक्के-चतुर्थ क्रमांक, रुतुज सराफ 90.2 टक्के-पाचवा क्रमांक, शर्वरी बल्लाळ 90.2 टक्के-पाचवा क्रमांक संपादन केला. एकूण 72 विद्यार्थांपैकी 6 विद्यार्थांनी 90 टक्केच्या वर गुण संपादन केले.
विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅविस, उपप्राचार्या लिजा सोजू, समन्वयक गुलनाज खान, शिक्षक श्यामसुंदर कांगणे, भरत बिर्हाडे, शिक्षिका कविता देशपांडे, भावना गांधी, प्रियांका गायकवाड, संध्या भट्टार, सचिन सोनार, अभिजीत डोंगरे, अभय पोतदार, शिक्षिका जसलीन कौर, विणा मेनन, नुसरत जबीन यांनी विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा, खजिनदार डॉ.भूपाली शहा, विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅविस, उपप्राचार्या लिजा सोजू, समन्वयक गुलनाज खान, सर्व शिक्षक व शिक्षिका, कर्मचारी यांनी विद्यार्थांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुककेले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.













