प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील ग्रंथालयाचे उद्घाटन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रयत विद्यार्थी विचार मंच संपर्क कार्यालयात डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील ग्रंथालयाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर ग्रंथालयाचे उद्घाटन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग भोसले यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे अध्यक्ष धम्मराज साळवे व महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग भोसले व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग भोसले साहेब यांनी असे मत व्यक्त केले की “भारत प्रजासत्ताक देश म्हणून चिरकाल टिकण्यासाठी अभ्यासू विद्यार्थ्यांची पिढी घडली पाहिजे आणि हे घडवण्याचे काम रयत विद्यार्थी विचार मंच करत आहेत.आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गोरगरीबांच्या झोपडीत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने हे ग्रंथालय सुरू होत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.”
यावेळी संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी असे आवाहन केले की ज्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेशी संपर्क करावा विद्यार्थ्यांना वाचानाकरिता हवी असणारी सर्व पुस्तके विनामूल्य दिली जातील.
यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग भोसले ,रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश महासचिव संतोष शिंदे,राज्य समन्वयक श्वेता साळवे,राज्य सहसचिव प्रगती कोपरे,राज्य प्रवक्ते प्रा.विक्रांत शेळके,राज्य संपर्क प्रमुख अतुल वाघमारे,अजय चक्रनारायन,निलेश आठवले,प्रशांत इंगळे,संतोष चौधरी, उपस्थित होते.













