ताज्या घडामोडीपिंपरीपुणे

पोर्षे कार प्रकरण : पुणे अपघात प्रकरणी जलदगतीने न्याय होणे साठी मुख्यमंत्र्यांना विनंती – ॲड संदीप चिंचवडे

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पुण्यातील उद्योग पती विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोर्षे कारनेबाईकला धडक दिली. या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाला.  पुणे अपघात प्रकरणी जलदगतीने न्याय होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष ॲड संदीप चिंचवडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व  दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पुणे येथील झालेल्या अपघातातील दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांना शासनाकडून भरपाई द्यावी.आरोपी बिल्डर व त्यांच्या पुत्रावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.

महाराष्ट्रातील जनता या प्रकरणी हळहळ व्यक्त करत आहे हे आपण सर्वांनी सामाजिक माध्यमे न्यूज चॅनल वर पाहिले आहे.यासाठी पोलिसानी तपासात कसल्याही प्रकारच्या उणीवा राहू नये यासाठी खबरदारी घ्यावी.यासाठी विशेष वकिलांची नेमणूक करावी.

या प्रकरणी जलदगती न्यायालयात हे प्रकरण वर्ग करण्यात यावे यासाठी लक्ष द्यावे.अपराधी व्यक्ती या मोठ्या सधन कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्याकडून तपास अथवा न्यायालयात या प्रकरणी उणीवा ठेवण्याच्या अनेक शक्यता आहेत त्यामुळे आपण जातीने याकडे लक्ष घालावे.या पूर्वीच मद्याचा पुरावा रिपोर्ट मध्ये नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.

सरकारने या प्रकरणात कसूर केल्यास किंवा आरोपी खुले सुटल्यास येत्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना सरकारला कसरत करावी लागेल याची दक्षता घ्यावी. पुणे शहरामध्ये अनेक पब्झ
अव्याहतपणे रात्रभर चालू आहेत.त्या बरोबरीने दारू अंमली पदार्थ हुक्का हे देखील सुरू आहे.
पोलिस खाते याला मदत करीत आहे.मोठे मोठे राजकारणी आणि गुंड आणि पोलिस अधिकारी अशी भागीदारी काही ठिकाणी असल्याची माहिती बाहेर आम्ही ऐकतो आहे.
खरे खोटे पोलिसाना माहीत आहे.परंतु आपण त्यांना बंद करू शकत नाही असे दिसते आहे कारण पोलिसांनी ठरवले तर हे चालू पण राहू शकत नाही.

बिल्डर,व्यापारी,अधिकारी स्वतः,शिवाय यांची मुले,तसेच बाहेरील राज्यातील सधन कुटुंबातील मुले या ठिकाणी येत असतात त्यामुळे व्यवसाय पण तितकाच मोठा हफ्ते पण तितकेच मोठे मिळत असतील. मोठ्या फाईवस्टार हॉटेल्स मध्ये देखील हे पब्स्चालू आहेत त्याठिकाणी देखील बाहेरच्या देशातील तरुण तरुणी येत असतात तिथेही हीच परिस्थिती आहे.

कायद्याचा धाक राहिलेला नाही.संस्कृती तर खूप लांब पुणे तर शिक्षणाचे माहेरघर संस्कृतीचे शहर कुठे चालले आहे? पुणे शहर मुंबई व्हायला वेळ लागणार नाही असे दिसते आहे.

एक्साईज खाते सुद्धा याला जबाबदार आहे असे दिसते आहे. त्यांचे पण नियम धाब्यावर बसवून दारू विक्री चालू आहे.

सदर प्रकरण जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात यावे.जलदगतीने या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी आपल्याला विनंती आहे.आरोपीला शिक्षा होण्याची गरज आहे.त्यासाठी निष्णात वकील राज्य सरकार चे वतीने नियुक्त करण्यात यावे.पोलिसांनी चार्ज शीट अथवा गुन्ह्याच्या तपासात कोणत्याही प्रकारची उणीव ठेवू नये यासाठी प्रयत्न करावे.

दारू व्यतिरिक्त या आरोपींनी कोणतेअंमली पदार्थ किंवा तत्सम पदार्थ सेवन केले होते का याची पण चौकशी व्हावी.अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर वर आळा घालावा. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी.

हुक्का विकणाऱ्या व्यावसायिकांना आळा घालावा.त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी.दारू विक्री अठरा वर्षाच्या कमी व्यक्तींना देण्यात येवू नये.दिल्यास व्यावसायिकावर कारवाई व्हावी.

व्यवसाय प्रामाणिकपणे करतात त्यांनाही हफ्ता खोरी पासून वाचवावे.पुणे शहराला या अंमली पदार्थांच्या विळख्यातून सोडवण्याची विनंती करत आहे.या प्रकरणातील आरोपी मोकाट सुटायला नको ही महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे, असे ही  निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button