Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजाखेडकर यांच्याबद्दल विविध प्रकारचे खुलासे झाले आहेत. चुकीच्या कागदपत्राच्या आधारे
त्यांनी बोगस दाखले, अपंग प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप झालेला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संदीप चिंचवडे यांनी केली आहे.

संदीप चिंचवडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना  दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पुजा खेडकर यांना मसुरी ट्रेनीसेंटर येथून माघारी बोलावण्यात आले आहे. महानगरपालिका व इतर ठिकाणांहून त्यांनी अपंग असल्याचे सर्टिफिकेट घेतले. त्यांना प्रमाणपत्र देणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. मर्जीतले अधिकारी फार पूर्वी पासून भरती होत असतील, तर भारतीय लोकशाही आणि व्यवस्था सुरक्षित नाही. यात जनता भरडली जाते. आमदार बच्चू कडू यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्याचे न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून राज्य शासनाकडून या प्रकरणी तातडीने कारवाई व्हावी. तसेच, अपंग जागेवर भरती झालेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रकरणांची सीआयडी चौकशी व्हावी, असे चिंचवडे यांनी म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version