ताज्या घडामोडीपिंपरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार बाबा कांबळे यांना प्रधान

Spread the love

 

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरामध्ये देण्यात येणारा अत्यंत मानाचा असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार 2024 यावर्षी कष्टकरी व कामगारांचे नेते बाबासाहेब कांबळे यांना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

यावेळी आमदार अश्विनी जगताप, भाजपा शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नाना काटे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी पक्ष नेते एकनाथ ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे , हराळे साहेब ,श्री लांडगे साहेब,नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष, धनंजय ताणले, सदस्य राजूभाऊ दुर्गे, गणेश खरात, बंडू मरकड, मीना सोनवलकर, आशाताई काळे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

दि. 31 मे रोजी सकाळी 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक मोरवाडी पिंपरी येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला.

पुरस्काराला उत्तर देताना बाबा कांबळे म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी या कर्तव्यनिष्ठ विज्ञानवादी व राजधर्म पाहणाऱ्या होत्या, राजधर्म पाळत असताना सत्याची बाजू घेऊन त्यांनी आपल्या मुलाला देखील शिक्षा ठोकण्याचा निर्णय घेतला. पुणे येथे नुकतेच एका बिल्डराच्या मुलाने दोन व्यक्तींना चिरडून ठार मारले, त्या नाबालिक दारुड्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या बिल्डर बापाने सर्व यंत्रणा खरेदी करण्याचा प्रयत्न केला, यासाठी ब्लड सॅम्पल देखील बदलण्यात आले.

अशा या परिस्थितीमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार किती महत्त्वाचे आहेत हे आधुलिखित होते आज हे विचार समाजाच्या तळागाळामध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे.त्यांचा नावाने मला पुरस्कार दिला हे मी माझे भाग्य समजतो या पुरस्कारामुळे ऑटो टॅक्सी व गोरगरीब कष्टकऱ्यांच्या लढ्याला बळ मिळेल असे बाबा कांबळे यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button