ताज्या घडामोडीपिंपरी

पीसीसीओई एसीएम स्टुडन्ट चॅप्टर सहाव्यांदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Spread the love
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या ‘पीसीसीओई एसीएम स्टुडंट चॅप्टर’ या  संघाने ‘एसीएम इंडिया बेस्ट स्टुडंट चॅप्टर फॉर आऊटस्टँडिंग ऍक्टिव्हिटीज अवॉर्ड’ हा पुरस्कार पटकावला. पीसीसीओई एसीएम स्टुडंट चॅप्टरने वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी व समाजातील विविध घटकांसाठी आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. याचे स्वरूप ४०,०००/- रुपये, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. या संघाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहा वेळा पुरस्कार पटकावले आहेत.
   हा पुरस्कार वितरण सोहळा भुवनेश्वर येथे नुकताच एसीएम इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमात एसीएम इंडियाचे कार्यकारी संचालक हेमंत पांडे आणि पर्सिस्टंट सिस्टीमचे विनीत कपूर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अमेरिकेतील इथरनेटचे संशोधक आणि एसीएम टुरिंग पुरस्कार विजेते रॉबर्ट मेटकॅफ, फोर्टीन ट्रीज फाउंडेशन संस्थापक प्रवीण भागवत, ब्राऊन युनिव्हर्सिटीचे श्रीराम कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीत होते. एसीएम इंडिया वार्षिक कार्यक्रम ही भारतातील संगणक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ आणि उद्योग समूहाची नामांकित संस्था आहे.
   महाविद्यालयाच्या वतीने पीसीसीओईचे एसीएम स्टुडन्ट चॅप्टर चे समन्वयक प्रा. राहुल पितळे आणि प्रा. गणेश देशमुख, विद्यार्थी अध्यक्ष प्रथमेश बच्छाव आणि विद्यार्थी खजिनदार नितीन पंडिता यांनी पुरस्कार स्वीकारला.
    हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे, संगणक विभागाच्या प्रमुख डॉ. के. राजेश्वरी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button