पीसीईटी निगडी कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, निगडी कॅम्पस मध्ये १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड पतंजली परिवाराचे संघटन मंत्री डॉ. नारायण हुले यांनी पीसीइटी अंतर्गत असणारे पीसीसीओई, पीसीपी, एसडीपीसीओडी, एसबीपीआयएम व पीबीएस महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योगा विषयी माहिती, प्रात्यक्षिक व सराव करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.
पीसीईटी अंतर्गत चार महाविद्यालयातील ८६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या मध्ये सहभाग घेतला. पीसीईटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे संचालक डॉ. शितल रवंदळे, पीसीसीओइचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.













