पीएमआरडीएच्या सदनिका सोडतीची प्रारुप यादी प्रसिद्ध

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यासंबंधी पात्र आणि अपात्र ठरलेल्या अर्जाची प्रारुप यादी बुधवारी (दि.१ जानेवारी रोजी) पीएमआरडीएच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून यावर ७ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे.
पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्र. १२ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएस प्रवर्गामधील ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिकांचा समावेश आहे. तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गातील ३४७ व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी १५ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. या सदनिकांसाठी ३ हजार २७१ अर्ज संकेत स्थळावर प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाची छानणीत ४७ अर्ज अपात्र ठरले असून ३ हजार २२४ अर्ज पात्र ठरले आहे. संबंधित पात्र आणि अपात्र ठरलेल्या अर्जाची प्रारुप यादी पीएमआरडीएच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून यावर ७ जानेवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. याची संबंधितांची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.
सोडतीचे वेळापत्रक
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिकांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छानणी करण्यात आली असून संबंधित यादी पीएमआरडीएच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर ७ जानेवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवता येईल. १३ जानेवारीला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करत २१ जानेवारीला ड्राय रननंतर २२ जानेवारीला अंतिम सोडत काढल्यानंतर पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.













