पिंपळे सौदागरला जोडणाऱ्या पुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करा – शत्रुघ्न काटे

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागरला जोडणाऱ्या पुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करा, शत्रुघ्न काटे यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. संबंधित कॉन्ट्रॅक्टर ,पालिका अधिकाऱ्यांसोबत पिंपरी ते पिंपळे सौदागर दरम्यान देवी आई माता व दत्तमंदिर जवळ पवना नदीवरील नियोजित नवीन पुल बांधण्याचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
जुनासदर ठिकाणी सतत होणारी वाहतुक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या दृष्टीने हे नव्याने बांधण्यात येणारे पूल खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
परिसरात दिवसेंदिवस वाढणारी नागरी लोकवस्ती आणि परिणामी रस्तावर वाढणारी अमर्याद अशी वाहतुकीची साधने याचा मोठा ताण पूर्वी असलेल्या जुन्या पुलावर पडत होता. सदर पूल हा अरुंद स्वरूपाचा असल्यामुळे वाहतूक कोंडी होणे स्वाभाविक होते. यावर तोडगा काढण्यासाठीच याच ठिकाणी रुंद असा पूल बांधण्याचे काम नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सततच्या पाठपुराव्याने सुरू करण्यात आले तसेच चौक परिसर सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून पुलाजवळील दोन्ही मंदिराच्या बाजूने म्युरल्स उभे करण्यात येणार आहे.
यावेळी शत्रुघ्न काटे यांनी सुरु असलेल्या कामाचा वेग वाढवून उर्वरित पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि पालिका प्रशासन यांना दिले आहे.













