चिंचवडताज्या घडामोडी
पिंपळे सौदागरमध्ये आज ‘दीपोत्सव २०२४’ चे आयोजन

चॅलेंजर पब्लिक स्कूल आणि निलेश काटे युवा मंचचा उपक्रम
पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल आणि निलेश काटे युवा मंच यांच्या वतीने शनिवारी (दि. ९) रोजी ‘दीपोत्सव २०२४’ आणि ‘दिवाळी फराळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ६:३० से ७:३० या दरम्यान संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन, सामजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे, विकास सक्सेना आणि नितीन वाटकर आहेत. विशेष आकर्षण म्हणून मराठा बटालियन यात सहभागी होणार आहे.
आपला देश, आपली सेना आणि आपल्या धर्मासाठी या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संचालक संदीप काटे यांनी केले आहे.














