पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलचा दहावी आणि बारावीचा निकाल १०० टक्के

बारावीमधे शिवम काकडे तर दहावीमध्ये सुजल भूते प्रथम
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी (दि. १३) रोजी जाहीर करण्यात आला. यात पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल या शाळेचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. चॅलेंजर पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
इयत्ता बारावीमधे शिवम काकडे हा विद्यार्थी ९१ टक्के गुण प्राप्त करुन बारावी सायन्स विभागात पहिला आला आहे. इयत्ता दहावीत देखील तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. इयत्ता दहावीमध्ये सुजल गणेश भूते हा ९८.६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. विशेष बाब म्हणजे सूजलने गणित आणि संस्कृत या दोन्ही विषयात पैकीच्या पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. दहावीच्या परीक्षेत मनस्वी पंकज मिश्रा हिने द्वितीय आणि जिजाऊ जगताप हिने तृतीय स्थान प्राप्त केले आहे. मनस्वीने गणित विषयात १०० गुण मिळविले आहेत.
शाळेचे संस्थापक, अध्यक्ष संदीप काटे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान कामगिरीचे कौतुक केले आहे. या यशामधे शाळेच्या सर्व शिक्षिका, प्रिन्सिपल मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे, हे त्यांनी आवर्जन नमूद केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या उत्ज्वल भविष्यासाठी संदीप काटे यांनी भरभऊन शुभेच्छा दिल्या आहेत.













