ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपळे गुरव पोलीस चौकीबाहेर अस्वछता, महापलिका प्रशासनाचे दुर्लक्ष मेघराज लोखंडे यांच्याकडून महापलिका अधिकाऱ्यांची कान उघडणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मेघराज लोखंडे यांनी पिंपळे गुरव पोलीस चौकी येथे आढावा व पाहणी करत महानगरपालिका प्रशासन येथे दुर्लक्ष करत आहे व त्या ठिकाणी अस्वच्छता खूप जास्त प्रमाणात पसरली आहे. डेंग्यू,चिका अश्या प्रकारच्या रोग पोलीस बांधवांना झाल्यास त्या ठिकाणी जबाबदार कोण? असा प्रश्न देखील मेघराज लोखंडे यांनी म.न.पा प्रशासनाला विचारला आहे.
मेघराज लोखंडे यांनी पोलीस चौकी येथे पाहणी करत संबंधित म.न.पा अधिकाऱ्यांना फोन लावून सूचना देत पोलीस चौकीतील बंद असलेले बंद स्ट्रीट लॅम्प,डासोत्पत्ती होऊ शकणाऱ्या ठिकाणी अळीनाशक औषध फवारणी तसेच अस्वच्छता असलेल्या ठिकाणी साफसफाई चे काम करून घेतले.अस्वच्छता असलेल्या ठिकाणी उद्यान विभागाने किंवा आरोग्य विभागाने साफसफाई साठी कर्मचारी वाढ करण्याची गरज असल्याचे मेघराज लोखंडे यांनी म्हणाले आहे.














