नमो चषक २०२४च्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी विधान सभेत भाजप युवा मोर्चा व क्रीडा प्रकोष्ट यांच्या माध्यमातून नमो चषक २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील मैदानावर उपमुख्यमंत्री ना. डॉ. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे, अशी माहिती आमदार उमा खापरे व क्रीडा प्रकोष्ट जयदीप खापरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा केंद्र व प्रदेश यांच्या निर्देशनवरून या स्पर्धाचे नियोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधान सभा शहा: क्रीडा स्पर्धा म्हणजेच नमो चषक, करण्यात येणार आहे. प्रथमच पिंपरी विधान सभेत युवा मोर्चा तुषार हिंगे व क्रीडा प्रकोष्ट जयदीप खापरे व
तसेच आमदार उमा खापरे यांच्या सहकाऱ्यातून होत आहेत.
या क्रीडा स्पर्धा जिल्हा स्तरिय तसेच राज्य स्तरिय तसेच स्थानिक क्रीडा स्पर्धक सहभागी होणार आहेत. विविध शाळांमधून चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, एकांकिका स्पर्धा पण घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य असोसिएशन व महाराष्ट्र जिल्हा असोसिएशन च्या परवानगी ने या स्पर्धा
घेण्यात येत आहेत.
विविध जिल्ह्यातील स्पर्धक पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत तसेच स्थानिक स्पर्धक सुद्धा सहभागी होत आहेत. उपमुख्यमंत्री मा.डॉ. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्या मैदानात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.













