ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी विधानसभेत संवाद यात्रेला वाढता प्रतिसाद

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)विभागाकडून शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी दर रविवारी पिंपरी विधानसभेत आयोजित केलेली संवाद यात्रेचा दुसरा रविवाराची पदयात्रा काल दापोडी परिसरात नेहरू चौकातील शहीद भगतसिंग पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे महात्मा फुले नगर, आत्तार वीटभट्टी,एसएमएस कॉलनी, पवार वस्ती,गुलाब नगर,जय भीम नगर अशी मार्गक्रमण करत तानाजी मालुसरे स्मारकाजवळ यात्रेची सांगता झाली.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये सामान्य नागरिकांना पडणाऱ्या अडचणी,अनेक प्रलंबित काम यासोबतच विद्यार्थी,तरुण, महिला,कामगार,कष्टकरी छोटा दुकानदार, व्यापारी या सगळ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत नागरिकांची संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह घरोघरी पोचवण्यासाठी संवाद यात्रा खूप चांगले माध्यम ठरत आहे.

पवार साहेबांच्या विषयी लोकांची आत्मीयता, एकनिष्ठेची, भावना दिसून येते असे प्रतिपादन केले. यावेळी शहरातील पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व सोबत सामान्य नागरिक देखील या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले.

यावेळी शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे सामाजिक न्याय पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र यादव प्रदेश सरचिटणीस रतन भंडारी विवेक विधाते, अजिनाथ सकट, सचिन सकाटे,आकाश शिंदे,अजय कांबळे,हसीना सय्यद ,शहानवाज, सुभाष गालफाडे,अनिल गायकवाड, सागर राजगुरू,सुनील कांबळे,राजू आवळे, संतोष नेटके, अविनाश शिंदे ,अमर उदमले,विनय भाट, रोहित जाधव, कृष्णा वाघमारे,सतीश राजगुरू ,देशमुख साहेब उपस्थित होते.

संवाद पदयात्रेचे आयोजक सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष मयूर जाधव म्हणाले दर रविवारी पिंपरी विधानसभेतील कार्यक्षेत्रेमध्ये ही यात्रा अशाच पद्धतीने मार्गक्रमण करीत नागरिकांना अस्वस्थ करीत पिंपरी विधानसभेसाठी कार्यक्षम आमदार देण्याचे काम करेल असे सांगितले. सर्व उपस्थितांचे स्वागत व आभार मानून पदयात्रेचा समारोप झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button