ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी  प्रेमप्रकाश मीना यांची निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून  प्रेमप्रकाश मीना यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी विधानसभामतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.

निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या श्री. प्रेमप्रकाश मीना निवासाचा पत्ता – रुम. नं. अ/१०३, ग्रीन बिल्डींग , व्ही. व्ही आय.पी. सर्कीट हाऊस,क्विन्स गार्डन,पुणे ४११००१ असा आहे त्यांचा संपर्क क्रमांक ८९९९१५७६०९ व इमेल-expobs.pcmb@gmail.com असा आहे, निवडणूक खर्च निरिक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री. बाळासाहेब कोळेकर त्यांचा संपर्क क्रमांक ९८५०९०४६२७, असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक पिंपरी विधानसभा मतदारसंघ श्री. प्रेमप्रकाश मीना यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक यांनी दि. २२/१०/२०२४ रो २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघ श्री. प्रेमप्रकाश मीना कार्यालयास भेट दिली. त्यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी यांचेमार्फत प्रत्येक कक्षाची माहिती व विधानसभा निवडणूक कामकाज विषयक कार्यपध्दती बाबत माहिती घेवुन त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत तसेच मतदार संघातील त्याच्या काही तक्रारी असल्यास निवारणा करिता C-Vigil App तसेच 020-27650901 या Help Desk वर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, निवडणूक खर्च कक्ष समन्वय अधिकारी माधुरी बांदल ,आचारसहिंता कक्ष समन्वयक सुनिल भागवानी, माध्यम कक्ष समन्वयक विजय भोजणे, निवडणूक खर्च निरिक्षक यांचे मुख्य समन्वयक सचिन साठे, यांचे सहाय्यक सुरेंद्र देखमुखे उपस्थीत होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button