ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी न्यायालयात न्यायाधीशांचा निरोप समारंभ

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी न्यायालयात न्यायाधीशांचा निरोप समारंभ पार पडला. पिंपरी नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश मे.आर.एस.वानखेडे,मे.आर.एम.गिरी,मे.पी.सी.फटाले,मे.एस.पी.कुलकर्णी यांची विविध ठिकाणी बदली झाली असल्यामुळे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन व्दारे निरोप समारंभ वकील बार रूम येथे घेण्यात आला .

त्यानिमित्त नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश में. एन. आर. गजभिये, में.बी. डी. चौखंट, में.एम. जी. मोरे, में.ए. एम. बगे, में.एम. ए. आवळे, में.व्ही. एन. गायकवाड व आजी माजी अध्यक्ष व वकील बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन चे अध्यक्ष व कार्यकारणी द्वारे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
विविध वकील बांधवांनी न्यायाधीश साहेबांसाठी आपले मनोगत व शुभेच्छा व्यक्त केल्या.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आईस्क्रिम व भेळ पार्टीचे आयोजन केले होते.वकील बांधवांनी त्याचा आस्वाद घेत जुन्या आठवनींना उजाळा दिला.

डिजीनोटीस एप्लीकेशनचे ॲप डेमो व प्रेझेंटेशन श्री.यशपाल बावीसकर व टिमने केले त्यांना ही वकील बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन चे अध्यक्ष अध्यक्ष ॲड.रामराजे भोसले,उपाध्यक्ष ॲड.प्रतिक्षा खिलारी,सचिव ॲड.धनंजय कोकणे,महिला सचिव ॲड.मोनिका सचवाणी,सह-सचिव ॲड.उमेश खंदारे,खजिनदार ॲड.अजित खराडे,ॲाडिटर.ॲड.संदिप तापकिर
सदस्य,ॲड.अस्मिता पिंगळे, ॲड.आयाज शेख,ॲड.फारूख शेख,ॲड.दशरथ बावकर,ॲड.स्वाती गायकवाड,ॲड.मिनल दर्शले यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव ॲड.धनंजय कोकणे व आभार सदस्य ॲड.आयाज शेख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button