पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती नेहरूनगर येथिल कोर्टात साजरी करण्यात आली.
या वेळी पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम.बगे , माजी अध्यक्ष ॲड.नाना रसाळ, अध्यक्ष ॲड.प्रमिला गाडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. न्यायालयाच्या सरकारी अभियोक्ता साधना बोरकर, मा.अध्यक्ष ॲड.सुनील कडुस्कर, उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, ॲड.नितीन कांबळे, ॲड.संभाजी वाघमारे, ॲड.सुनील माने, ॲड.उमेश गवळी, यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनप्रवासावर कथन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. बी. के.कांबळे, ॲड.नितीन कांबळे, ॲड.सागर अडागळे , ॲड.प्रशांत भडकुंभे, ॲड.प्रविण जगताप,ॲड.विजय फडतरे, ॲड.उमेश गवळी, असोसिएशन चे सहसचिव अड.श्रीराम गालफाडे, सदस्य ॲड.जयेश वाघचौरे, ॲड.सुर्यकांत शिंदे ॲड. राहुल बावीस्कर,ॲड.विनोद आढाव आदी वकील बांधव उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचान असोसिएशन चे सदस्य ॲड. विशाल पौळ यांनी केले व आभार प्रदर्शन ॲड.तेजस चवरे यांनी केले.













