पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. प्रमिला हरीश गाडे व उपाध्यक्ष ॲड.गोरख भागवत कुंभार यांची केंद्र सरकार मार्फत नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महारष्ट्रातील 14,648 वकिलांची भारत सरकारने नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भाची यादी गुरुवार दि.14 रोजी उशिरा भारत सरकारच्या वेबसाईट वर जाहीर करण्यात आली. या नियुक्त्या करिता दोन वर्षापूर्वी ओनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
वकिली व्यवसायात कायदेशीर कामे पार पडताना अधिकृतपणे स्वाक्षरी पाहणे, शपथ घेणे, कागद पत्रे प्रमाणित करणे या प्रकारचे अधिकार नोटरी द्वारे वकिलांना प्राप्त झाले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळामधील ही पहिलीच वेळ आहे, ज्यामध्ये 10 वर्षापुढील वकिली व्यवसायात असणाऱ्या बहुसंख्य वकिलांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे सर्व नवनियुक्त नोटरी वकिलांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.













