पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन तर्फे नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) या कायदा विषयावर चर्चासत्राचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नेहरूनगर येथील पिंपरी न्यायालयात नवीन भारतीय न्याय सहिता (BNS) या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वीचा इंडियन पिनल कोड (IPC) या कायद्यामध्ये बदल करून शासनाने नवीन भारतीय न्याय सहिता (BNS) हा कायदा अस्तित्वात आणलेला असून या कायद्याची लवकरच अमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्यामधील झालेले बदल या विषयी वकील बंधू व भगिनी यांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने असोसिएशन च्या वतीने पुणे जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील ॲड.पी.व्ही.चौरे यांना नवीन भारतीय न्याय सहिता (BNS) या कायदा विषयी चर्चा व मार्गदर्शन करण्याकरिता निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला हरीश गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख भागवत कुंभार, जेष्ठ विधीज्ञ ॲड.मदन छाजेड, मा.अध्यक्ष ॲड.सुनिल कडूसकर, ॲड.नारायण रसाळ(नाना), ॲड.अरुण खरात(मामा), ॲड.सुरेश वायकर यांच्या हस्ते या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून लाभलेले पुणे जिल्हा सरकारी वकील ॲड. पी.व्ही.चौरे यांचा सत्कार करण्यात आला. या चर्चासत्रामध्ये ॲड.बी.के.कांबळे, ॲड.सुनील गायकवाड, ॲड.नारायण थोरात, ॲड.संगीता कुशलकर, ॲड.शीला दळवी, ॲड.संकल्पा वाघमारे, ॲड.विशाल पौळ, ॲड.जयेश वागचौरे ॲड.पल्लवी कुऱ्हाडे, ॲड.विनोद आढाव, ॲड.घोरपडे, ॲड.अजिंक्य मराठे, ॲड.सागर पोवार, ॲड.महेश गायकवाड, ॲड.मुस्ताफिज शेख, ॲड.संतोष महानवर, ॲड.संभाजी वाघमारे, ॲड.साबळे, ॲड.बनसोडे , ॲड.आशिष रोकडे इ.वकील मान्यवर सहभागी झाले होते.













