पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने वकील बार रूम मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, माजी अध्यक्ष ॲड.नारायण (नाना) रसाळ, ॲड.सुनिल कडूसकर, ॲड.जे.के.काळभोर ( काका ) ,ॲड.गायकवाड, ॲड.अरुण (मामा) खरात, ॲड.बी.के कांबळे, ॲड.अधिक चरेगावकर,ॲड. राजेश रणपिसे, ॲड.रुपाली पवार,ॲड.अंजली सावंत, ॲड. गुंजाळ, ॲड. सुरेखा शेख इ.वकील मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, महिला सचिव ॲड.वर्षा तिडके, खजिनदार ॲड.ऐश्वर्या शिरसाठ ॲड.जयेश वाकचौरे, ॲड.तेजश चवरे, ॲड.विशाल पौळ यांच्याकडून करण्यात आले.













