पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी केबल टाकण्याच्या कामास स्थायी समितीची मंजुरी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत महापालिकेच्या विविध विभागातील युपीएससाठी बॅटऱ्या खरेदी करणे, विविध विभागांसाठी झेरॉक्स मशीन खरेदी करणे, महापालिका शाळांसाठी सक्षम मराठी पुस्तके (भाग १,२,३) छपाई करून देणे, एम्पायर इस्टेटच्या पुलापासून डी मार्टमार्गे दापोडी-निगडी रस्ता विकसित करणे व इंडोलिंक युरोसिटी येथील रस्ता विकसित करणे या प्रकल्पाच्या निविदापश्चात कामाकरिता सल्लागार नेमणे, प्रभाग क्र. २६ कावेरीनगर, वेणुनगर, कस्पटेवस्ती येथील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण हटविणेकामी मिशनरी पुरविणे, प्रभाग क्र. २५ पुणे-बेंगलोर हायवेच्या पश्चिमेकडील वाकड, पुनावळे, ताथवडे व इतर परिसरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच आरोग्य विभागास मशिनरी पुरविणे, पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी केबल टाकणे व खोदलेला रस्ता पुर्ववत करणे या कामाच्या वाढीव खर्चास मान्यता देणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.













