ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरात कर्करोगावरील उपचार तातडीने सुरू करा – डॉ. सतिश कांबळे

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात कर्करोगावरील उपचार तातडीने सुरू करा, अशी मागणी शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र राज्यप्रमुख डॉ. सतिश दत्तात्रय कांबळे यांनी आयुक्ताकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशिया खंडातील सर्वोत्तम महानगरपालिका म्हणून उल्लेख असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या जवळपास २५ लाख आहे व जवळपास महानगरपालिकेच्या आस्थापनेचे एकूण ७ रुग्णालय असतानादेखील यापैकी एकाही रुग्णालयात कर्करोगासारख्या गंभीर व जीवघेणा आजारावर उपचार करण्याकरिता डॉक्टर उपलब्ध नाहीत. ही पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांकरिता मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार थेरगाव येथे १०० खाटांचे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे, असे समजते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत वेगवेगळ्या विभागाचे करोडोचे टेंडर पास केले जातात. परंतु आरोग्यासारख्या गंभीर विषयाबद्दल अधिकार्यांना विसर कसा पडू शकतो? ही एक गंभीर बाब म्हणावी लागेल . पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यविषयी आपल्याला कुठलीही काळजी राहिली नाही, हे या कृतीतून दिसून येते. पैसा झाला मोठा, जीव झाला छोटा.

पिंपरी चिंचवड शहरात ३५००हून अधिक कर्करोगग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत व त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे, खाजगी रुग्णालयामध्ये पैशा अभावी उपचार घेता येत नाही? कधी उपचाराकरिता उपनगरांमध्ये जावे लागत आहे, जो सर्वसामान्य गरीब रुग्णांना न पेलवणारा खर्च आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनामध्ये पॅकेज कमी असल्याने केमोथेरपी तसेच सर्जरी आम्ही करू परंतु औषधे, लॅब बाहेरून करा व पेटस्कॅन १८०००, अशा अडचणींमुळे गोरगरीब रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. या आजाराची तीव्रता पाहता, जोपर्यंत थेरगावमध्ये रुग्णालयाचे प्रस्तावित काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी महानगरपालिकेच्या आस्थापनेच्या वायसीएम, जिजामाता, भोसरी, आकुर्डी, थेरगाव, तालेरा, यमुनानगर, सांगवी या ७ ही रुग्णालयांमध्ये कर्करोग ओपीडी ही लवकरात लवकर सुरु करावी. तरी, माणुसकीच्या दृष्टीकोनातून आपण पिंपरी-चिंचवड मधील रुग्णांसाठी ओपीडी सुरु करण्याचा हा महत्वपूर्ण निर्णय घ्याल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi