ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड शहरातील पबची पाश्चिमात्य संस्कृती हद्दपार करा, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार 

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील पबची पाश्चिमात्य संस्कृती तातडीने हद्दपार करा. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिमा मलिन होत आहे.नाहीतर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर रस्त्यावर उतरू, असा इशारा मनसेने आयुक्तांना दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्या काही दिवसापुर्वी पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा काही दिवसात इतर भागातील व्हिडिओ समोर आले आहेत. नुकतेच पुण्यातील फक्त २३ पबला कायदेशीर परवानगी आहे आणि प्रत्यक्षात १४४ सुरु होते हि आकडेवारी उघडकीस आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील पबची पाश्चिमात्य संस्कृती तातडीने हद्दपार करा. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिमा मलिन होत आहे. वास्तविक पहाता पिंपरी चिंचवड हे विद्येचे माहेरघर आहे तसेच सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक मान्यवर प्रतिष्ठीत मंडळी या शहरात वास्तव्याला आहेत.

नाहीतर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर रस्त्यावर उतरून हे सगळं बंद करू, या पबमध्ये अवैध्य धंदे सुरू आहे यावर आवश्यक कायदेशीर कारवाई होत नाही.

तसेच आयुक्त  पिंपरी चिचवड महानगरपालिका आपणही याबाबत शहरातील हॅाटेलच्या नावाखाली पबची अवैध्य धंदे व हॅाटेलचे अनाधिकृत बांधकामाची तसेच (टॅक्स) कराबाबतची चौकशी करून त्वरित कारवाई करावी.पबमध्ये अवैध्य धंदे सुरू असलेल्या काही भागात हिंजवडी,वाकड,सौदागर पिंपळे इत्यादी काही भागात नागरिक वैतागले आहे.

त्यामुळे आपल्या पिंपरी चिंचवड शहरी भागातील पबवरती पोलीसानकडून त्वरित कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने केली आहे. पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरामधिल पब संस्कृतीच हद्दपार केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जर पोलिसांनी या शहरातील पबविरोधात सगळ्यांना दिसेल अशी कारवाई केली नाही, तर मात्र आम्ही पिं.चिं.मनसे रस्त्यावर उतरू असा इशारा आयुक्तांना दिला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi