ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने औद्योगिक परिसरांसाठी स्वीकृत संचालकाची नेमेणूक

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने पवारवस्ती चिखली येथील लघुउद्योजक व मेहेर एन्टरप्रायसेसचे संचालक श्री. दिपक तिवारी यांची पवारवस्ती, कुदळवाडी, जाधववाडी चिखली या औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकाना शासन दरबारी येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्याकरिता स्वीकृत संचालक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी पवारवस्ती कुदळवाडी, चिखली या औद्योगिक परिसरातील लघुउद्योजक मोठयासंख्येने उपस्थित होते. या वेळी दिपक तिवारी यांना स्वीकृत संचालक नेमणुकीचे पत्र देण्यात आले.













