पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व ओळखून वृक्षारोपण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटने तर्फे सेक्टर क्रमांक ०७, PCNTDA भोसरी येथे वड, पिंपळ, कडूनिंब, चिंच अशा विविध ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक प्रमोद राणे, सचिन आदक, स्वीकृत संचालक माणिक पडवळ, सुरेश गवस, संजय भोसले, तसेच लघुउद्योजक प्रकाश ढमाले, संजय बन्सल, हेमंत मोरे, बबनराव दळवी, माणिक ढोकळे, विजय निमसे, सतीश कदम, संदीप फटांगडे, श्रीमंत राठोड आणि अनेक लघुउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चालू वर्षी उन्हाळा खूपच कडक जाणवला असून याकरिता झाडांची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे.
झाडांचे मानव जातीला व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खूप फायदे आहेत. पिंपरी चिंचवड लघुद्योग संघटनेने झाडांचे महत्व ओळखून ऐन पावसाळा सुरु होण्याच्या दिवसात व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हे वृक्षारोपणचे कार्य हाती घेतलेले आहे.
चालू पावसाळ्यात असा वृक्ष लागवडीचा उपक्रम एम.आय.डी .सी. मधील सर्व ब्लॉक मध्ये राबवून साधारणपणे एक हजार झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने समोर ठेवलेले आहे.













