पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील आयसीयु व एनआयसीयु बेडची संख्या वाढवा – नाना काटे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील आयसीयु व एनआयसीयु बेडची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्ताकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अर्थातच रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली (ICU) अतिदक्षता बेड कमी पडत असल्यामुळे रुग्णांना वेटिंग वर ठेवले जात आहे.
परिणामी सिरीयस असलेल्या रुग्णांना लवकर ICU मधील उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवाने रुग्ण
दगावले जातात . महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये फक्त पिंपरी चिंचवड हद्दीतील रुग्ण असतातच परंतु
आसपासच्या व बाहेर गावाहून देखील रुग्ण येत असतात. त्यामुळे अतिदक्षता (ICU व NICU )
विभागावर ताण पडत आहे. हे लक्षात घेता रुग्णांची संख्या विचारात घेऊन महानगरपालिकेने अजून ICU
व NICU बेडची संख्या वाढवावी, असे ही निवेदनात म्हटले आहे.













