Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा थेरगांव येथील स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे रविवार, दिनांक २० ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता सभासदांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे होते.

            संघटनेचे सरचिटणीस श्री. अभिमान भोसले यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन केले व सर्व विषयांना सभासदांची बहुमताने मंजुरी घेण्यात आली. सदर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने कर्मचा-यांसाठी केलेल्या विविध कामांची माहिती देण्यात आली. तसेच मे. राजकिशोर ऍ़ण्ड असोसिएटस् यांनी सादर केलेल्या सन २०२३ च्या लेखापरिक्षण अहवालास सभासदांची मंजुरी घेण्यात आली. तसेच महानगरपालिकेतील कर्मचा-यांना लागु असलेल्या वैद्यकीय विमा योजनेतील अडचणींसंदर्भात सभासदांसमोर चर्चा करण्यात आली.

            यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष  मनोज माछरे,  महादेव बोत्रे, खजिनदार  नितीन समगीर, चिटणीस मंगेश कलापुरे, सहसचिव  उमेश बांदल, मुख्य संघटक  दिगंबर चिंचवडे, कार्यकारिणी सदस्य लाला गाडे,  दत्तात्रय ढगे,  चंद्रशेखर गावडे, संजय कापसे,  आण्णासो वाघोले,  विशाल बाणेकर,  सुरज टिंगरे,  धर्मेंद्र शिंदे,  नंदकुमार इंदलकर,  गोरख भालेकर आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version