पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने सामूहिक क्षमापना कार्यक्रम कल्याण प्रतिष्ठान चिंचवडगाव येथे मंगलमय वातावरणात संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने गेली पंधरा वर्षापासून सामूहिक क्षमापनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
जैन धर्मातील सर्व संप्रदायातील साधु साध्वी आणि श्रावक, श्राविका यांचा एकत्रित क्षमापना समारंभ चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठान मध्ये अतिशय मंगलमय आणि धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ जैन साध्वी उपप्रवर्तिनी परमपूज्य डॉ प्रिय दर्शनाजी म सा, प पू डॉ प्रणवदर्शनाजी म सा, प पू धैर्य कीर्तीश्रीजी म सा , प पू हर्षितप्रज्ञाजी म सा, प पू ईशदर्शनाजी म सा , ह्या साध्वी जी मंचावर उपस्थित होत्या. या वेळी सर्व साध्वीजींनी क्षमापनाचे महत्त्व विशद सांगितले. विशेष म्हणजे ज्यांच्या शी आपला अबोला आहे , काही कारणावरून बोलणं बंद आहे अशा व्यक्तिंना क्षमा करायची असते आणि क्षमा याचना करायची असते असे प्रतिपादन केले.सर्वप्रथम चिंचवडगाव जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री अशोक बागमार, यांनी सर्वांचे स्वागत केले.
पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले ,आणि कार्याध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी क्षमापना संदेश वाचून महासंघाचे वतीने सर्व उपस्थितांना कडून क्षमायाचना केली! सर्व भाविकांनी क्षमायाचना केली.
यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, प्रा प्रकाश कटारिया, सुर्यकांत मुथियान,तसेच महामंत्री,विजय भिलवडे ,नेनसुख मांडोत ,संदेश गदिया,तुषार मुथा , शुभम कटारिया ,अभिनंदन छाजेड , श्रेणिक मंडलेचा,सचिन कोगनाळे , अविनाश भोकरे,प्रा सुरेखा कटारिया तसेच इतर श्री संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी सुभाष ललवाणी, प्रकाश गदिया ,अनुप नहार,अशोक लुंकड, मनोज बाफना, दिलीप भन्साळी,प्रा सुरेश धाडीवाल, देवेंद्र पारख, सुभाष सुराणा ,आदि मान्यवर श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या!नंदु लुनावत आणि वसंतलाल मुथा यांनी सूत्रसंचालन केले.




















