पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी या परीक्षेमध्ये शेकडा 80 टक्के व 75 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान समारंभ आणि शान समारंभात पार पडला.
प्रमुख अतिथी म्हणून यूपीएससी परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीतील आय डी एस अधिकारी डॉ सुदर्शन लोढा, उद्योजक राहुल मुनोत , महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, विद्यमान अध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष श्रेयस पगारिया आणि इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ लोढा म्हणाले ” युपीएससी सारख्या उच्च आणि कठीणतम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जिद्द ,परिश्रम ,सखोल अभ्यास करण्याची तयारी,आणि चिकाटी या गोष्टींची आवश्यकता असते. कठोर परिश्रमाला पर्याय नाही हेच खरं आहे.नियोजन योग्य असेल आणि त्याप्रमाणे अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते .
डॉ अशोककुमार पगारिया यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,प्रा प्रकाश कटारिया यांनी अतिथींचा परिचय करून दिला,उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले आणि श्रेयस पगारिया यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी महासंघाचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष विलास पगारिया, सुर्यकांत मुथियान, प्रा . प्रकाश कटारिया, तसेच महामंत्री विजय भिलवडे, विविध जैन श्रावक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनामध्ये महासंघाचे पदाधिकारी हितेश सुराणा, संदेश गदिया, तुषार मुथा, श्रेणिक मंडलेचा, अभिनंदन छाजेड,सचिन कोगनाळे शुभम कटारिया, संदिप फुलफगर, आदिंनी परिश्रम घेतले













