ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा विजयाचा झंजावात

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी, चिंचवड  भोसरी या तीन ही विधानसभेत महायुतीचे तीनही उमेदवार विजयी झाले.

चिंचवडच्या आखाड्यात महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी दुरंगी लढत वाटत असली तरी, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर कुणाचा ताप वाढविणार, याविषयी चर्चा रंगली होती. मात्र अशातच आज मोजणीच्या पहिल्या फेरीपासून शंकर जगताप आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अखेर चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचेभाजपाचे उमेदवार शंकर जगताप हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांचा पराभव केला आहे. जगताप यांच्या विजयानिमित्त थेरगाव परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे.

भोसरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे हे 63 हजार 634 मतांनी विजयी झाले. त्यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली. त्यांनी महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा पराभव केला. लांडगे यांच्या विजयानिमित्त भोसरी परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे. तसेच महेश लांडगे यांच्या भोसरी येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला.

विधानसभेच्या जातीसाठी राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे विजयी झाले आहेत. त्यांना एक लाख ८ हजार ९४९ मते मिळाली. शेवटच्या विसाव्या फेरी अखेर त्यांनी ३६६९८ मतांची आघाडी घेत विजयी घौडदौड कायम ठेवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button