पिंपरीत संघटनांच्या वतीने मनुस्मृती दहन आंदोलन इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यास विरोध

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस नागरी हक्क सुरक्षा समिती पक्ष संघटनांच्या वतीने शुक्रवारी पिंपरीत “मनुस्मृती दहन” आंदोलन केले.
इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या पाठ्यक्रम शालेय शिक्षण विभागाकडून तयार केलेला असून, त्यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमात केल्याने पुन्हा एकदा चातुवर्ण्य, अंधश्रद्धा याला खतपाणी घालण्याचे व समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत होत आहे. तसेच शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा चंचुप्रवेश कोणालाही मान्य नसून, कदापिही त्याचा समावेश केला जाता कामा नये,आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, ही सर्वमान्य समाज प्रतीकात्मकरित्या सरकारला समजावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक- पिंपरी येथे मनुस्मृती दहन हे आंदोलन केले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारावंत मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष अॅड.
चंद्रशेखर भुजबळ, नगरसेवक तुषार कामठे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, समता परिषदेच्या महिला शहराध्यक्षा
वंदना जाधव, कार्याध्यक्ष पांडुरंग महाजन, नकुल महाजन, अॅड. विद्या शिंदे, प्रदीप पवार, देवेंद्र तायडे, सुरेश गायकवाड, सतीश काळे, प्रतिभा बनसोडे, संतोष माळी, प्रवीण कदम, प्रकाश जाधव, नरेंद्र बनसोडे, डॉ. मनीषा गरुड आदी उपस्थित होते.













