पिंपरीतील वीजपुरवठा आज चार तास राहणार बंद

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी शाखा कार्यालय अंतर्गत आज दि.०६.०३.२०२५ रोजी गुरुवारी २२ केव्ही HA1 व HA2, पिंपरी फीडर वर अत्यंत तातडीचे दुरुस्तीचे कामे करायची आहेत. त्यामध्ये २२ kv पिंपरी गाव व २२ केव्ही वाघेरे फीडर वरील खालील ठिकाणचा वीज पुरवठा सकाळी ठिक १०.०० वाजेपासून ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
पिंपरीतील डेअरी फार्म रोड, अशोक थेटर, साई चौक, शनी मंदिर गल्ली, बालामल चाळ, गेलार्ड चौक, pwd वैष्णवी मंदिर गल्ली, वाघेरे कॉलोनी १,२,३,४, गीता निवास, जुना काटे पिंपळे रोड, समृद्धी हॉटेल समोरील परिसर, भीम नगर, शीतलादेवी, महालक्ष्मी मंदिर, माळी आळी, बालामाल चाळ, नाणेकर कॉम्पलेक्स जवळील परिसर इत्यादी. ठिकाणचा वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी आज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तरी सर्व वीज ग्राहकांनी याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.













