पिंपरीतील एच. ए. स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीतील एच. ए. स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एच. ए. कंपनीच्या एम. डी. निरिजा सराफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसी स्काऊट गाईड व आरएसपीच्या संचालन केले. राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक प्रार्थना करण्यात आली. पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी ‘आम्ही मुले या देशाची’ हे नृत्य सादर केले. माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी ‘होऊ सारे एक अखंड भारत’ हे गीत गायले.
यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, शिक्षक प्रतिनिधी रमेश गाढवे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, पालक प्रतिनिधी व माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील खाद्यपदार्थ, प्राणी, पक्षी व वनस्पती या संदर्भामध्ये हस्तलिखित तयार केले होते. तसेच सहावीच्या विद्यार्थ्यांनी व्याकरणावर आधारित हस्तलिखित तयार केले होते व सातवीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन स्थळे यावर हस्तलिखित तयार केले होते. याचे प्रकाशन निरिजा सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी नेत्रा गावडे हिने निरिजा सराफ यांचे रेखाटलेले चित्र सराफ यांना भेट देण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने अथलेटिक्स मैदानी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुषमा निरगुडकर, आभार मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी मानले.













