पिंपरीगावातील महात्मा फुले क्रीडांगणात पसरले घाणीचे साम्राज्य, क्रिडांगणाची साफसफाई करण्याची सामाजिक युवा कार्यकर्ते सुहास कुदळे यांची मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी गाव पवनेश्वर मंदिर जवळील महात्मा फुले क्रीडांगणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास खेळाडू वर्गाला होत आहे, या क्रिडांगणाची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी पिंपरीतील सामाजिक युवा कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी महापालिका प्रशासनाला प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी गाव परिसरात नव्याने विकसित होत असलेल्या या क्रीडांगणा रोज सकाळी – संध्याकाळी व्यायामासाठी , वॉकिंग साठी जेष्ठ नागरिक, तरुण सहकारी , खेळाडू येत असतात. या घाणीच्या साम्राज्यामुळे त्यांना खूप नाहक त्रास होत आहे. तसेच संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी मद्यपींचा अड्डा बनलेला आहे. महापालिका प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा तेथे कारवाई होत नाही. या ठिकाणी अक्षरशः रोज संध्याकाळी मद्यपींची मैफिल बसते. खूप मोठ्या प्रमाणात तेथील स्थानिक नागरिकांना व खेळाडू वर्गांना जेष्ठ नागरिकांना खूप भयानक त्रासाला सामोरे जावे लागत आहे . प्रशासनाने साफसफाई करून घ्यावी व पोलिसांनी मद्यपीवर योग्य ती कारवाई करावी . जेणेकरून साफसफाई केल्याने नागरिकांची दुर्गंधीतून सुटका होईल व इतर होणाऱ्या नाहक त्रासातून नागरिकाचा बचाव होण्यासाठी मदत होईल, असे ही निवेदनात म्हटले आहे..














