ताज्या घडामोडीपिंपरी

पाच दिवसीय महाशिवरात्री महोत्सव आणि शिवशंभो ५ मार्चपासून व्याख्यानमाला

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर, चिंचवड येथील शिवमंदिर प्रांगणात मंगळवार, दिनांक ०५ मार्च ते शनिवार, दिनांक ०९ मार्च २०२४ या कालावधीत पाच दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ०५ मार्च रोजी सायंकाळी ७:०० वाजता महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, पिंपरी – चिंचवड प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, कामगार आयुक्त – पुणे अभय गीते, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे या मान्यवरांच्या उपस्थिती राहील.
महाशिवरात्री महोत्सवांतर्गत शिवशंभो व्याख्यानमालेत मंगळवार, दिनांक ०५ मार्च रोजी ‘श्रीराम मंदिर अयोध्या : इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल सोलापूरकर हे प्रथम पुष्प गुंफतील. बुधवार, दिनांक ०६ मार्च रोजी ‘कोरोनानंतरचे मुलांचे भावविश्व’ या विषयावर लोणावळा येथील मनशक्ती केंद्रप्रमुख मयूर चंदने द्वितीय पुष्पाची गुंफण करतील. व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुरुवार, दिनांक ०७ मार्च रोजी नरेंद्र आमले आणि उमेश घळसाशी हे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्युशी संवाद’ या विषयावरील अभिवाचनाने गुंफतील. दिनांक ०८ मार्च रोजी शिवशंभो कार्यगौरव पुरस्कार आणि शिवशंभो स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची वेळ सायंकाळी ०७:३० वाजताची असून शनिवार, दिनांक ०९ मार्च रोजी सायंकाळी ०६:०० ते १०:०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय महोत्सवात भजन, शिव अभिषेक, होमहवन, पूजा, काल्याचे कीर्तन, शिवलीलामृत पारायण आणि रक्तदान शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमाला आणि महाशिवरात्र महोत्सवासाठी  शिवशंभो फाउंडेशनचे कार्यकर्ते व पदाधिकारी राजेश हजारे, संजय देशमुख, दत्तात्रय भुसे, काळुराम साकोरे, विद्याधर राणे, विकास शेवाळे, खंडू बारवकर, विठ्ठल मुसळे, कैलास पोखरकर, शर्मा अंकल, रघुवीरसिंग नाना गिरण, राजेंद्र पवार, योगेश हजारे तसेच राणेकाकू, आश्र्विनी महांवर , सविता बारवकर, ज्योती भुसे, नलिनी इंगलकर, रूपाली तोरखडे, सीमा साकोरे, रेणुका हजारे, अरुणा घोळवे, उज्ज्वला शेवाळे, शशिकला देशमुख, विद्या राणे, वंदना गांगुर्डे, दीपाली भोईटे यांनी परिश्रम घेतले आणि नियोजन केले आहे.
नागरिकांनी महोत्सवाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आणि अध्यक्ष संजय तोरखडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button