परिमंडळ कार्यालयाच्या परिसरात एजंट लोकांचा बंदोबस्त करावा – सचिन काळभोर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – परिमंडळ
कार्यालयाच्या परिसरात एजंट लोकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सचिन काळभोर यांनी पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत शासनामार्फत राबवित
असलेल्या लाडकी बहीण योजने अंतर्गत रेशनकार्ड कार्यालयात शिधापत्रिका कामकाजासंबंधी
कामकाज करणेसाठी लोकांची(विशेषत: महिलांची गर्दी वाढत आहे. शिधापत्रिका संबंधी सर्व
कामकाज हे संगणकीय प्रणालीद्वारे (Online) मार्फत केले जाते. त्याअनुषंगाने कार्यालय परिसरात
बरेच प्रमाणात एजंट लोक हे आलेल्या लोकांची दिशाभुल करून कार्यालय व अधिकारी यांची नावे
घेवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचे निदर्शनास आले.
त्याअनुषंगाने आपल्या मार्फत सदरील एजंट यांचेवर
कारवाई किंवा बंदोबस्त करून शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याकरीता संबंधित व्यक्तींवर
एजंटवर योग्य ती कारवाई करणेत यावी
तथापी पुढील कार्यवाही करावी.













